कट्टर शिवसैनिकाचा छगन भुजबळ यांना इशारा 'लखोबा लोखंडे, साहेबांना दिलेला त्रास जनता विसरणार नाही, आहे तिथेच राहा'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ते पुन्हा शिवसेना प्रवेश करणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकल्या आणि कट्टर शिवसैनिक (Shivsainik) पुन्हा चिडले. प्रसारमाध्यमांतील वृत्तामुळे चिडलेल्या काही शिवसैनिकांनी तर थेट पोस्टरच लाऊन जाहीर विरोध दर्शवला आहे.

Shivsainik Gives Ultimatum To NCP Leader Chhagan Bhujbal | (Photo Credits: Twitter)

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना (Shiv Sena) सोडून अनेक वर्षं उलटून गेली तरी कट्टर शिवसैनिकाच्या मनात आजही त्यांच्याविषयी प्रचंड संताप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ आणि पहिल्या फळीतील नेते छगन भुजबळ यांची घरवापसी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ते पुन्हा शिवसेना प्रवेश करणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकल्या आणि कट्टर शिवसैनिक (Shivsainik) पुन्हा चिडले. प्रसारमाध्यमांतील वृत्तामुळे चिडलेल्या काही शिवसैनिकांनी तर थेट पोस्टरच लाऊन जाहीर विरोध दर्शवला आहे. छगन भुजबळ यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य असाणारे व्यंगचित्र असलेल्या पोस्टरच्या माध्यमातून 'लखोबा लोखंडे, साहेबांना दिलेला त्रास जनता विसरणार नाही, आहे तिथेच राहा', असा इशाराच शिवसैनिकांनी भुजबळ यांना दिला आहे.

काय म्हटले आहे पोस्टरमध्ये?

केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काही तरी नावाचे पूर्वी तमाशात वघ नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी (भुजभळ यांच्याशी मिळते जुळते व्यंगचित्र) मिळते जुळते वाटते. उगवला दिवस की मी परत येतो... साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही. आहे तिथेच राहा - शिवसैनिक

बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का

दरम्यान, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हायात असताना त्यांना राजकीय मोठे धक्के बसले. ज्याचा बाळासाहेबांना प्रचंड त्रास झाला, असे बाळासाहेबांचे निकटवर्तीय सांगतात. त्यात छनग भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली हे धक्के मोठे आणि प्रमुख होते. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्याची घटना फार नंतर घडली. पण, बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि शिसेनेच्या मोठ्या नेत्याने शिवसेना सोडण्याची पहिली घटना छगन भुजबळ यांच्या रुपात घडली होती. (हेही वाचा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच, शिवसेना प्रवेशाची माझ्या नावाची चर्चा निराधार: छगन भुजबळ)

ट्विट

शिवसैनिक आणि छगन भुजबळ संघर्ष

छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर राजयीक वर्तुळात प्रचंड मोठी उलथापालत झाली. तसेच, शिवसेना, बाळासाहेब आणि छगन भुजबळ असा थेट संघर्षही महाराष्ट्राने पाहिला. त्यातून सुरु झालेले आणि एकमेकांच्या प्रेमाखातर परत घेतलेले न्यायालयीन लढेही जनतेने पाहिले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी पक्षांतर केल्यावर त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांना झालेली अटक मोठी वादग्रस्त ठरली. तेव्हापासून शिवसैनिक आणि छगन भुजबळ असा संघर्ष निर्माण झाला. त्यानंतरच्या काळात छगन भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. ती भेटही गाजली पण, शिवसैनिकांच्या मनात भुजबळ यांच्याविषयी असलेला राग काही कमी झाला नाही. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या निमित्ताने कट्टर शिवसैनिक आणि भुजबळ यांच्यातील राग आणि संघर्ष मात्र पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now