Shivaji University: डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती; अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के (Dr. Digambar Shirke) यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Vice-Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. दिगंबर शिर्के (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के (Dr. Digambar Shirke) यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Vice-Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. 6)  डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ दिनांक 17 जून रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ शिर्के यांचा जन्म 11 जून 1965 रोजी झाला आहे. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. शिवाजी विद्यापीठाच्या  कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

(हेही वाचा: मुंबई विद्यापीठ 'आयडॉल' अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या)

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ अश्विनी कुमार नांगिया आणि राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement