मुंबईत आजपासून रंगणार पहिली मल्लखांब विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा; 15 देशांचे 150 खेळाडू सामील

मुंबईच्या शिवाजी पार्क येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

मल्लखांब (Mallakhamb)... मराठी मातीतला एक महत्वाचा खेळ. कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून या पारंपरिक खेळाकडे पाहिले जाते. ताकद, वेग, लवचिकता, मानसिक एकाग्रता वाढवणारा हा खेळ आता हळू हळू इतर राज्यांमध्येही पोहचला आहे. मल्लखांबाचे फायदे लक्षात आल्यावर या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही मानाचे स्थान प्राप्त होत आहे. लोप पावत चाललेल्या या खेळला टिकवून ठेवण्यासाठी तसेच जगातील सर्व मल्लखांबपटूंना एकत्र आणण्यासाठी मल्लखांबाची पहिली ‘विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा’ (Mallakhamb World Championship) आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.

16 आणि 17 फेब्रुवारी रोजी, देशविदेशातील मातब्बर मल्लखांबपटूंना एकत्र आणत विश्व मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने भारतीय मल्लखांब महासंघ आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्यातर्फे मल्लखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. यजमान भारतासह जर्मनी, झेक रिपब्लिक, बांगलादेश, स्पेन, इटली, अमेरिका, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम अश्या एकूण 15 देशांचे 150 खेळाडू आणि अधिकारी या स्पर्धेत भाग घेणार आहेत. एका देशातून या स्पर्धेसाठी 6 मुले व 6 मुली असे एकूण 12 जणांचा चमू सहभागी होणार आहे. सांघिक, वैयक्‍तिक व मानवी मनोरे या गटात या स्पर्धा होतील. यामध्ये पोल व रोप मल्लखांब यांचा समावेश असेल. (हेही वाचा : शरीरसौष्ठव पटूंचा चित्तथरारक खेळ रंगणार, येत्या 17 फेब्रुवारी पासून ‘मुंबई श्री’ला सुरुवात)

क्रीडामंत्री विनोद तावडे, खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेतील आकर्षण म्हणजे उमेश कदम, तोंडात आणि हातात आगीचे पेटते 9 चुडते घेऊन उमेश मल्लखांबावरील कसरती करणार आहे. शनिवारी 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता उमेशचे हे अग्निदिव्य पार पडेल.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

NZ vs ENG, 3rd Test Match Day 2 Preview: इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतील का? की न्यूझीलंडचे गोलंदाज कहर करणार, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

Tim Southee Retirement: निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात; शानदार कारकिर्दीचा शेवट (Watch Video)