Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभेतील सर्व जागा लढवण्याच्या घोषणेनंतर शिवसेनेचा यू-टर्न
तसेच शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र, भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिले होते.
शिवसेनेने (Shiv Sena) काल उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh Assembly Election 2022) सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र, भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिले होते. शिवसेनेच्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष यूपीतील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज फक्त 100 जागांवर निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेना किती जागेवर लढणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेशातील एकूण 403 जागांपैकी 100 जागा लढवणार आहोत. तर, गोव्यात आम्ही 20 जागांवर निवडणूक लढवू आणि युती करू शकतो. गुजरातमध्ये विजय रूपाणी यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता ही त्यांची अंतर्गत बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी मुंबईत सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बोलावली बैठक
एएनआय ट्वीट-
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी किती जागेवर लढणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एक दिवसापूर्वीच, शिवसेना राज्य कार्यालयाने पक्ष सर्व 403 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती दिली होती.