Kolhapur Loksabha: 'घोडा मैदान लांब' तरीही मातब्बरांकडून आतापासूनच फिल्डींग; कोल्हापूर लोकसभा 2 जागांसाठी मोर्चेबांधणी
या जिल्ह्यात कोल्हापूर (Hatkanangle Lok Sabha Constituencies) आणि हातकणंगले (Kolhapur Lok Sabha Constituencies) असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. महाविकासआघाडी आणि शिवसेनेतील अभूतपूर्व बंड या घडामोडींनी राज्यातील राजकारणाचा पोत आणि समिकरणे कमालीची बदलली आहेत.
लोकसभा निवडणुकीस (Lok Sabha Election 2024) तसा अजून बराच अवकाश आहे. असे असले तरी दिवस पूर्वीचे राहिले नाहीत. हे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना ठावूक झाल्याने त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. खास करुन कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात ही मोर्चेबांधणी अधिक घट्ट पाहायला मिळते आहे. या जिल्ह्यात कोल्हापूर (Hatkanangle Lok Sabha Constituencies) आणि हातकणंगले (Kolhapur Lok Sabha Constituencies) असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. महाविकासआघाडी आणि शिवसेनेतील अभूतपूर्व बंड या घडामोडींनी राज्यातील राजकारणाचा पोत आणि समिकरणे कमालीची बदलली आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नवी समिकरणे, रणनिती उदयास येऊ पाहात आहे. परिणामी अनेक दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना पक्षाच्या तिकीटावर कोल्हापूरमधून संजय मंडलीक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने विजयी झाले. परिणामी कोल्हापूरमध्ये शिवसेनेने बाजी मारली. आता मात्र हे दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात पुन्हा नव्याने समिकरणे जुळवाजूळव केली जात आहे. (हेही वाचा, Shiv Sena Anniversary: शिवसेना वर्धापन दिन; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे समर्थकांडून तयारी सुरु, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा)
कोल्हापूर जिल्ह्यात आपला एकही खासदार नाही, ही बाब भाजपने विचारात घेऊन या जिल्ह्यात बांधणी सुरु केली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या रुपात असलेल्या शिवसेनेच्या दोन्ही जागा आपल्याकडे घ्यायचा भाजपचा विचार आहे. हे मतदारसंघ आपल्याकडे आले तर, त्या ठिकाणी समरजित घाटगे, शौमिका महाडिक, सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांच्या नावांसाठी चाचपणी सुरु आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही या ठिकाणी हक्क सांगत आहेत.
दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही हे आमचे नैसर्गिक मैतदारसंघ असल्याचे सांगत दावा सांगितला आहे. दोन्ही ठिकाणी खरेतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना पाठिमागच्या अनेक वर्षांपासून सुरु राहिला आहे. हातकणंगलेमध्ये हा सामना राजू शेट्टी विरुद्ध राष्ट्रवादी असा व्हायचा. मागच्या वेळी तो धैर्यशिल माने विरुद्ध राजू शेट्टी असा झाला. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्येही हा सामना शिसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच राहिला. या ठिकाणी सेनेचे मंडलीक विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघात जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांचेही नाव चर्चेत येत आहे.
दरम्यान, काँग्रेसची या जिल्ह्यात बऱ्यापैकी ताकद आहे. या जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दोनपैकी किमान एक तरी मतदारसंघ आम्हाला द्यावा अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाल्यास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार पी.एन. पाटील, बाजीराव खाडे यांची नावे उमेदवारीसाठी पुढे येऊ शकतात. राजू शेट्टी हे काही जागा मिळाल्या तर मविआसोबत येऊ शकतात अशी चर्चा आहे.