Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार? सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाविरोधात समविचारी पक्षांच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या महिला शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची भेट घेतली.
गेले आठवड्यात अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) विरोधकांबाबत केलेले वक्तव्य चांगलं भोवण्याच्या मार्गावर आहे. औरंगाबादेत (Aurangabad) बोलत असतांना पत्रकाराने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता सत्तारांनी अपशब्द वापरला. पत्रकाराबाबत संवाद साधतांना त्यांनी संपूर्ण विरोधकांबाबत ते वक्तव्य केल पण सुप्रिया सुळे या महिला नेत्या असुन महिलांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने सत्तारांविरुध्द टीकेची झोड उठली. तरी सत्तारांच्या या वक्तव्याचा फक्त राष्ट्रवादीचं (NCP) नाही तर कॉंग्रेस (Congress), शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अशा विविध पक्षांकडून विरोध दर्शवण्यात आला पण सत्तारांच्या त्या एका वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याचे चिन्ह आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि समाजवादी (Samajwadi Party) पक्षासह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या महिला शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची (Bhagat Singh Koshyari) भेट घेतली. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन (Jaya Bachchan) यांची विशेष उपस्थिती होती. (हे ही वाचा:- Jitendra Awhad Resignation: जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय, ट्वीट करत केला खळबळजनक खुलासा)
दरम्यान पत्रकारांशी संवाद साधत असताना समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) म्हणाल्या अब्दुल सत्तारांच्या महिलाविरोधी वक्तव्याबाबत आज आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्याकरींची (Governor Bhagat Singh Koshyari) भेट घेतली आणि लवकरच राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मूची ही भेट घेणार आहोत. महिलांचा अपमान महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी सहन केल्या जाणार नाही. अशा प्रकारचं महिलांविरोधी निच वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला मंत्री पदावरुन बेदखल करायला हवं अशी प्रतिक्रीया जया बच्चन यांनी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)