IPL Auction 2025 Live

Shiv Sena (UBT) Shakha Demolish by BMC: उद्धव ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शिवसेना शाखेवर बुलडोजर, अनधकृत असल्याचे सांगत महापालिकेची कारवाई

मुंबईतील वांद्रे (Bandra ) परिसरात असलेली ही शाखा (Shiv Sena (UBT) Shakha Demolish by BMC) अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. ए

Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथून हाकेच्या अंतरावर असलेली शिवसेना शाखा (Shiv Sena (UBT) Shakha) पाडण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे (Bandra ) परिसरात असलेली ही शाखा (Shiv Sena (UBT) Shakha Demolish by BMC) अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. एकदोन नव्हे तर तब्बल 40 वर्षे जुनी असलेल्या या शाखेवर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आलेबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असताना ही शाखा स्थापन करण्यात आली होती. ही शाखा शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरचे कार्यालय म्हणून चालवली जात होती.

शिवसेना शाखेवर कारवाई करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद सदस्य सचिन अहीर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. महापालिकेने केलेली कारवाई म्हणजे दडपशाही आहे. ही शाखा काही आज एका रात्रीत उभा राहिली नाही. या शाखेतून अनेक नगरसेवक, आमदार, खासदार निवडून गेले आहेत. आज सत्तेत असलेले लोक (शिंदे गट) ज्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, ते बाळासाहेबही कधीतरी येथे आले गेले असतील. अशा शाखेवर कारवाई करताना यांना काहीच वाटले नाही? असा सवाल अहीर यांनी शिंदे गटाला केला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Thackeray Family Security: 'ते आम्हाला गोळ्या घालू शकतात किंवा तुरुंगातही टाकू शकतात'; ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

दुसऱ्या बाजूला शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनीही शाखेवर झालेल्या कारवाईचे समर्थन करत प्रतिक्रिया दिली आहे. एखादी इमारत, कार्यलय जुने आहे म्हणजे ते ऐतिहासिक होत नाही. जर ते अनधिकृत असेल आणि त्या त्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असेल तर ती योग्य आहे. जे जे अनधिकृत आहे ते ते हटविण्यात यावे, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांनीही पालिकेच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. शिवसेना शाखेवर केलेली कारवाई अत्यंत सूड भावनेतून झाली आहे. ही शाखा पाडण्यासंदर्भात आम्हाला कोणत्याही स्वरुपाची नोटीस आली नव्हती. ही शाखा 40 वर्षे जुनी आहे. अगदी नव्याने उभारलेली झोपडी जरी असेल तरीसुद्धा त्याला कायदा लागू होतो. ही शाखा तर 40 वर्षे जुनी आहे. त्यामुळे या शाखेवर कारवाई करायची असेल तर त्यासाठी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे ही कारवाई म्हणजे केवळ सूड असल्याची भावना खा. अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.