सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करण्यासाठी पार्थ पवार यांचा वापर? शिवसेनेला शंका
ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काही मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्यांचे महत्त्व, असे मत शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून व्यक्त करण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Suicide Case) प्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी करणे हा मूर्खपणा असला तरी महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, जुणेजाणते लोकही सीबीआयची 'री' ओढत आहेत. सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरीता पार्थ पवार (Parth Pawar) यांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. शिवसेना मुखपत्र (Shiv Sena Mouthpiece) दैनिक सामना (Dainik Saamana Editorial) संपादकीयातून 'कारल्याची भाजी' या मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात शिवसेने पार्थ पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया यावर भूमिका मांडली आहे.
सामना संपादकीयामध्ये म्हटले आहे की, संपूर्ण पवार कुटुंब हे राजकाणातले तालेवार. हा तालेवारपणा अजित पवारांपर्यंत पोहोचला. पण माणसाची जीभ नियंत्रणात नसेल त मोठा फटका बसतो. असे फटके अजित पवार यांनी राजकीय प्रासात अनेकदा खाल्ले. त्यामळे अजित पवार जाहीरपणे सांगत असतात. पण, चि. पारथ हे नवखे असल्याने जरा वेगात बोलतात. त्याचे पडसादही उमटतात. अर्थातच छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे चि. पार्थ हे नवे आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून वाद निर्माण होतात. शरद पवार यांनी या वादावर पाणीच ओतले. (हेही वाचा, राजभवनातील गंजलेल्या तोफांतून सरकार पाडणार असल्याचे मनसुबे कोणी रचू नयेत- शिवसेना)
या संपादकीयात पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वैगेरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काही मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्यांचे महत्त्व, असे मत शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून व्यक्त करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरुन वादळ उठले आहे. म्हटले तर वादळ, म्हटले तर काहीच नाही. हे चहाच्या पेल्यातले वादळही नाही. पण चर्चांचे रवंथ वृत्तवाहिन्यांवर सुरु आहे. चोवीस तास 'सबसे तेज' स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांची मिरची मसाला हवा असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त चि. पार्थ यांचे आहे, असेही सामनामध्ये म्हटले आहे.
चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यवी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वैगेरे कसरतीचे प्रयोग करुन कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद या दृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल. पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या अनेकांना कटू बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कटू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटलेआहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय पंतप्रधान मोदी यांनाही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत, असेही या संपादकीयात म्हटले आहे.