शिवसेना, NCP, काँग्रेस 'महाआघाडी'ची राज्य सरकार, केंद्र सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
मात्र, तेव्हा शिवसेना या एकाच पक्षाने याचिका दाखल केली होती. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून प्रथमच एकत्रितपणे याचिका दाखल केली आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात शिवेसना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Cour) याचिका दाखल केली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी घटनेने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आल्याचे समजते. या याचिकेसाठी या तिन्ही पक्षांकडून कोणता वकिल कायदेशीर बाजू लढवणार हे अद्याप समजू शकले नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सुनिल फर्नांडीस यांचे नाव यांचे नाव सध्या तरी पुढे येत आहे.
दरम्यान, शिवसेनेने या आधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, तेव्हा शिवसेना या एकाच पक्षाने याचिका दाखल केली होती. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून प्रथमच एकत्रितपणे याचिका दाखल केली आहे. (हेही वाचा, अजित पवार यांच्यासोबत मिळून मजबूत आणि स्थिर सरकार देणार; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास)
याचिकेमधील प्रमुख मुद्दे
- राज्यपालांनी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे
- अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव घ्यावा
- अधिवेशनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करावे
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात राज्यपालांना वरील मुद्द्यांना अनुसरुन आदेश द्यावेत अशी विनंतीही केली आहे. पण, या याचिकेवर न्यायालय सुनावणी घेणार का? घेतली तर कधी घेणार. तेवढा वेळ बाकी आहे का या प्रश्नांची उत्तरे मात्र सध्यातरी अनुत्तरीतच आहेत.