Shiv Sena On Sachin Vaze Arrest: सचिन वाझे यांना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- शिवसेना

त्यांनी वाझे यांना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून केले जात आहे, असे दैनिक सामना संपादकीयात म्हटले आहे.

Sachin Vaze | (File Photo)

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना केंद्रीय तपास पथक अर्थातच एनआयए (NIA) ने अटक केली. त्यावर आता शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक समना (Saamana Editorial) संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे हे आश्चर्यच आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्री तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून केले जात आहे. वाझे यांना अटक करुन दाखवली. याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत, अशा शब्दात सामना संपादकीयातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

सामनात पुढे म्हटले आहे की, अंबानींचे नाव आल्याने हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरु झाल्या, पण काही दिवसांतच या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत हे प्रकरण लावू धरले. सरकारने वाझे यांची बदली करुन संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्यातील दहशतवादविरोधी पथकाकडे दिला. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच केंद्र सरकारने एनआयएला तपासाला पाठवले. त्याची इतक्या तातडीने गरज नव्हती. पण महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात ना खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील? वीज जिलेटिन कांड्यांचा व गाडी मालकाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएने हाती घेऊन लगेच वाझे यांना अटक करण्याची कर्दबगारी दाखवू दिली. (हेही वाचा, Sachin Vaze Arrested : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न; नाना पटोले यांचा पलटवार )

वाझे यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर, या चर्चेला आता अर्थनाही. विरोधकांची सरकारने अस्थिर किंवा बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला जायचे बनावट प्रकरणे निर्माण करायची, राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करायचे हे प्रकार सध्या सर्रास चालले आहेत. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? असा सवाल शिवसेना मुखपत्रातून विचारण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif