MLA Sanjay Gaikwad Independent: महायुतीला तडा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
MLA Sanjay Gaikwad Independent Candidate: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या महायुतीस तडा गेला की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
MLA Sanjay Gaikwad Independent Candidate: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या महायुतीस तडा गेला की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या जागावाटपावर ताठर भूमिका घेतल्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. तोडगा काढण्यासाठी बोलणी सुरु आहेत. तोवरच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच धक्का देत शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेना (शिंदे गट) तिकीटावर प्रतिनिधित्व करत आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जागावाटपामध्ये काही ठिकाणी खासदारांना पुन्हा संधी देण्यात येईल, तर काही ठिकाणी जागावाटपानुसार मतदारसंघात फेरबदल करण्यात येईल अशी चर्चा आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचेही बोलले जाते आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे हे आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचे तिकीट जाहीर करु शकले नाहीत. एका बाजूला विद्यमान खासदारांचा दबाव तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून होत असलेली वरकडी अशा विचीत्र कोंडीत मुख्यमंत्री शिंदे अडकले आहेत. असे असताना थेट मुख्यमंत्र्यांना धक्का देत आणि विद्यमान खासदारालाच बाजुला सारत आमदार संजय गायकवाड यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, MLA Sanjay Gaikwad Beating Youth Video: आमदार संजय गायकवाड यांची तरुणाला काठीने बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल)
सांगितले जात आहे की, आमदार गायकवाड यांनी एक नव्हे तर चक्क दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एक अर्ज हा अपक्ष आहे तर दुसरा शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज दाखल केला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाकडून अधिकृतरित्या एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही. असे असताना आमदार महोदयांनी अर्ज दाखल केलाच कसा याबातब आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: भाजपला लोकसभेत किती जागा मिळतील? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भविष्यवाणी)
महायुतीमध्ये जागावाटपावरुन जोरदार कुरबुरी सुरु असल्याची चर्चा आहे. अलिकडेच बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांनी महायुतीच्या संभाव्य उमेदवाराच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे. शिरुर आणि बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना घाम फोडला आहे. सातारा आणि माढा येथील जागेवरुनही महायुतीमध्ये वाद आहे. असे असताना महायुती काय तोडगा काढणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad ON Narayan Rane: 'घरात घुसून हिशोब चुकता करु', शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा नारायण राणे यांना इशारा)
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा खल सुरु असला तरी भाजपणे मात्र चाणाक्ष खेळी करत वाद नसलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मित्रपक्ष जागावाटपाच्या चर्चेत गुंतले असताना भाजपच्या उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना प्रचारासाठी रान मोकळे झाले आहे. त्यांनी प्रचारास सुरुवातही केली आहे.