Shiv Sena MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रिम कोर्टात नव्याने सादर करणार वेळापत्रक; आमदार अपात्रता प्रकरण

या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या वेळापत्रकावरुन सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) या आधीच्या सुनावणीत जोरदार ताशेरे ओढले.

Rahul Narwekar | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे महाराष्ट्राच्या इतिहासातील आणि राजकीय वर्तुळातील सर्वात गुंतागुंतीचे तितकेच उत्कंटा वाढविणारे प्रकरण ठरले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या वेळापत्रकावरुन सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) या आधीच्या सुनावणीत जोरदार ताशेरे ओढले. कोर्टाने अध्यक्षांना इतक्या मोठ्या प्रमाणावर झापण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर विधानसभा अध्यक्ष आता नव्याने तयार केलेले वेळापत्रक सुप्रिम कोर्टाला आज सादर करतील. कायदा आणि राजकीय वर्तुळातील सर्वांनाच उत्सुकता आहे की, हे वेळापत्रक तरी न्यायालयाला मान्य होणार की न्यायालयय आज काही वेगळा आदेश देण्याचा निर्णय घेतात.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपल्या वेळापत्रकात कोणत्याही प्रकारे बदल करणार नाहीत. जर सुप्रिम कोर्टाने त्याबाबत लेखी आदेश दिले तरच ते सुधारीत वेळापत्रक तयार करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्याता आहे. दुसऱ्या बाजूला असेही बोलले जात आहे की, विधानसभा अध्यक्षांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन नव्याने वेळापत्रक तयार केले आहे. जे आज सादर करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंनी उलटसुल चर्चा सुरु आहेत. त्याची पुष्टी मात्र अधिकृतरित्या होऊ शकली नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या मनात नेमके काय आहे, याबाबत सुप्रिम कोर्टातच उलघडा होणार आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या याचिका एकत्रितपणे ऐकली जाणार आहे.

विधानसभा अध्यक्षांनी या आधी सादर केलेले वेळापत्रक अत्यंत गुंतागूंतीचे आहे. केवळ वेळकाढूपणा करण्यासाठीच ते बनविण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी कोर्टात केला होता. त्यानंतर कोर्टाने आरोपीतील तथ्य पडताळणी करुन विधानसभा अध्यक्षांना हे वेळापत्र नव्याने सादर करण्याचे आदेश दिले. या वेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर जोरदार ताशेरे ओढत त्यांना कोणीतरी कायदा समजून सांगण्याची गरज असल्याचेही कोर्टाने म्हटले.

शिवसेना (UBT) सोबतच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावरही सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. परिणामी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासाठी आजचा दिवस अत्यंत हायहोल्टेज म्हणावा असा आहे. अर्थात कोर्टात का घडते याकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे तर सामान्य जनता आणि मतदाराचेही लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असेल याकडेही अनेकांचे डोळे आहेत.