MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला मोठा दणका, दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश
त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता (Shivsena MLA Disqualification Case) प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून (Thackeray Group) पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नोटीस जारी केली आहे. तसेच त्यांना दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचेही निर्देश दिलेत. (हेही वाचा - Shiv Sena MLA Disqualification Case: उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा; पक्षाचे 14 आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांची निकालात माहिती)
सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल देखील केला. यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं म्हटलं. शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेना देत कोणत्याही गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदाराला अपात्र केलं नाही. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना नोटीस जारी केली असल्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत तर नाही ना येणार अशा चर्चा सुरु आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल.