Vedanta Foxconn Deal फिसकटल्यावरून पुण्यात Aaditya Thackeray यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे 24 सप्टेंबरला जनआक्रोश आंदोलन

शिवसेनेच्या युवासेनेकडून वेदांताचा प्रकल्प गुजरातला हलवल्याने महाराष्ट्रातील तरूणांच्या नोकर्‍यांच्या लाखो संधी गेल्याने उद्योगमंत्र्यांविरूद्ध नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.

Aaditya Thackeray | PC: Instagram

महाराष्ट्रातून गुजरातला Vedanta Foxconn सेमीकंडक्टरचा प्रकल्प नेण्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार वर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर आता त्यांच्याच नेतृत्त्वाखाली शिवसेना आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राच्या वाट्याला आला असताना तो अचानक गुजरातला हलवल्याने 24 सप्टेंबरला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात जनआक्रोश आंदोलन (Janakrosh Andolan) केले जाणार आहे. महाराष्ट्रात सत्तांतरानंतर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असे संघर्षाचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत पण पहिल्यांदाच आदित्य ठाकरे थेट आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान देणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Aaditya Thackeray Statement: राज्याने वेदांत-फॉक्सकॉनच्या 1 लाख नोकऱ्या आणि बल्क ड्रग पार्कच्या 70,000 नोकऱ्या गमावल्या, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य .

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत डावोस मध्ये असताना आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पाची देखील माहिती घेतली होती. त्यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात वेदांता फॉक्सकॉनची गुंतवणूक करण्याची पूर्ण तयारी होती. संबंधित प्रक्रिया सुरू झाली होती. पुण्याजवळ तळेगावची जागा निश्चित झाली होती. असे असताना अचानक प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? हा प्रकल्प गुजरातला नेल्याने करोडो रूपयांची गुंतवणूक आणि लाखो लोकांच्या रोजगारांच्या संधी गेल्या आहेत. यावरून आता पुन्हा शिंदे सरकार विरूद्ध उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले शिवसैनिक आक्रमक होणार आहेत.

दरम्यान शिंदे सरकार कडून आदित्य ठाकरेंच्या दाव्याला उत्तर देताना महाविकास आघाडी सरकार कडूनच उशिर झाल्याने आणि कोणताही लेखी व्यवहार न झाल्याने प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर फोडण्यात आलं आहे. सध्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकार या प्रकल्पाच्या तोडीस तोड दुसरा प्रकल्प महाराष्ट्राला देईल असे म्हटलं आहे. तर मूळ प्रकल्प गेला तरीही संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात येईल का? यासाठी चाचपणी सुरू असल्याचं म्हटलं आहे.

वेदांता फॉक्सकॉन कडून गुजरातला प्रकल्प गेल्याचं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही प्रकल्पासाठी आम्ही इच्छित असल्याचं जाहीर केले आहे. शिवसेनेच्या युवासेनेकडून रोजगाराच्या संधी गेल्याने उद्योगमंत्र्यांविरूद्ध नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.

महाविकास आघाडीच्या काळात राज्याच्या वाट्याला अजून 2-3 प्रकल्प आता महाराष्ट्र गमावत असल्याची भीती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बोलून दाखवली आहे.