Shiv Sena Dasara Melava 2023:  शिवसेना दसरा मेळावा, शिवजी पार्क कोणाचं? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच

पाठिमागील काही दशकांचे समिकरण. पहिली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव उद्धव यांचा 'इथे जमलेल्या माझ्या तमाम...' हे उद्गार आणि उपस्थितांचा जल्लोष अनेकांच्या सवयीचा झाला होता. मात्र..

Shiv Sena Dasara Melava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आणि मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरील दसरा मेळावा. पाठिमागील काही दशकांचे समिकरण. पहिली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव उद्धव यांचा 'इथे जमलेल्या माझ्या तमाम...' हे उद्गार आणि उपस्थितांचा जल्लोष अनेकांच्या सवयीचा झाला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या रुपात पक्षात मोठे बंड झाले आणि निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सगळे सूत्रच बदलले. त्यामुळे शिवतीर्थ कोणाचे? प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आणि रस्सीखेच वाढली. पाठिमागच्या वर्षी झालेला संघर्ष याही वर्षी होणार काय? असा सवाल उपस्थित होऊ लागल आहे.

शिवेसना पक्षातील बंडानंतर पाठिमागील वर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टकचेऱ्या झाल्या. कोर्टाच्या आदेशानुसार पाठिमागच्या वर्षी हे मैदान ठाकरे गटाला मिळाले. यंदा मात्र मैदान कोणाला मिळते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण दोन्ही बाजूंनी मागणी होणार हे स्वाभाविक. प्राप्त माहितीनुसार दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क आपल्यालाच मिळावे यासाठी जवळपास महिनाभरापूर्वीच एक पत्र बीएमसी विभागीय कार्यालयाला पाठविण्यात आल्याचे समजते. पालिकेचा विधीविभाग या पत्रावर कायदेशीर सल्ला घेत असल्याचे समजते. दरम्यान, जर हे मैदान मिळाले नाही तर मेळाव्यासाठी पालिकेने प्लॅन बी तयार केल्याचे समजते.

दरम्यान, दरसा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाले नाही तर दोन्ही गटांकडून पर्यायी मैदानाचा विचार केला जातो आहे. पाठिमागच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी एमआरडीए मैदानावर पार पडला होता. यंदा तिथे विकास कामे सुरु आहेत. त्यामुळे आता बीकेसी मैदानावर किंवा इतरत्र एखाद्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटासाठी विजयादशमी निमित्त आयोजित केले जाणारे मेळावे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. दोन्ही गटांची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि संघटनाबांधणी या मेळाव्याच्या माध्यमातून जनतेला दिसणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif