महासंहारक जैविक अस्त्रे बनवण्याच्या प्रयत्नातून कोरोना वायरस सारख्या विषाणूंची निर्मिती? शिवसेनेचा सवाल
चीन देशात प्रथम आढळून आलेला हा वायरस आता शेजारी भारत आणि अमेरिका, जपान, थाईलैंड यांसह जगभरातील जवळपास 30 देशांमध्ये पसरला आहे. कोरोना वायरस आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, त्याला अपेक्षीत यश अद्यपाही आले नाही
प्रत्येक वेळी जीवघेणे विषाणू चीनमध्येच कसे निपजतात याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामन संपादकीयातून (Saamana Editorial) कोरोना वायरस (Coronavirus) संकटाबाबत वेगळा पण गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पुढच्या युगातील महासंहारक जैविक अस्त्रे (Biological Weapons) बनविण्याच्या प्रयत्नातून तर असे काही विषाणू तयार होत नसावेत ना याचाही शोध जागतिक समुदयाने घेतला पाहिजे, असे थेट आणि सूचक विधानही संपादकीयात करण्यात आले आहे.
सामना संपादकियात म्हटले आहे की, अमेरिका, जपानसह अनेक प्रगत देश 'कोरोना वायरस' संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी असे जीवघेणे विषाणू चीनमध्येच कसे निपजतात याचाही शोध घेणे आवश्यक आहे. ज्या वुहान प्रांतात हा विषाणू आढळला तिथेच चीनची जैविक प्रयोगशाळा आहे. विविध प्राण्यांवर प्रयोग करण्याचे काम तिथे चालते. पुढच्या युगातील महासंहारक जैविक अस्त्रे बनविण्याच्या प्रयत्नातून त असे काही विषाणू तयार होत नसावेत ना याच शोद जाकतिक समुदायाने घेतला पाहिजे! (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस जागतिक अर्थव्यवस्थेवर करतोय नकारात्मक परिणाम?)
कोरोना वायरस जगभरातील अनेक देशांची डोकेदुखी ठरला आहे. चीन देशात प्रथम आढळून आलेला हा वायरस आता शेजारी भारत आणि अमेरिका, जपान, थाईलैंड यांसह जगभरातील जवळपास 30 देशांमध्ये पसरला आहे. कोरोना वायरस आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, त्याला अपेक्षीत यश अद्यपाही आले नाही. त्यामुळे या वायरसची लागण झाल्यावर नेमका काय उपाय करावा याबाबत अद्यापही उपाय सापाडला नाही.