Coronavirus: औरंगाबाद येथील शिवसेना पक्षाच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) शहरातही कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठे नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

Coronavirus: औरंगाबाद येथील शिवसेना पक्षाच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
Raosaheb Amle (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) शहरातही कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठे नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातच औरंगाबाद येथील शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब दानवे (Raosaheb Amle) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपाचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक म्हणजे, मंगळवारी नितीन साळवे या अन्य एका शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ज्यामुळे शिवसेने मागील दोन दिवसांत दोन नगरसेवक गमावले आहेत. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. दरम्यान, रावसाहेब आमले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी त्यांना औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी नितीन साळवे यांच्यावरही मागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर मंगळवारी उपचारादरम्या त्यांचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवसात दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे. हे देखील वाचा- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या 'एक शरद, सगळे गारद…!' या ऐतिहासिक मुलाखतीचा टिजर केला प्रदर्शित, नक्की पाहा

औरंगाबाद जिल्ह्यात आज 166 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 300 वर पोहचली आहे. यापैकी 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, हजार 824 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2020 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).