व्हिडिओ: शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्याकडून कोंबडी विक्रेत्यांना मारहाण, माहिम येथील घटना सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी एका सरकारी अभियंत्याला मारहाण करत त्याच्या अंगवार चिखल टाकल्याची घटना ताजी असतानाच मुंबई शहरातील शिवसेना नगरसेवकाचाही आणखी एक प्रताप पुढे आला आहे.

Shiv Sena Corporator Milind Vaidya assaulted Chicken traders | (Photo Credits: Twitter/ANI)

मुंबई: माहिम येथील शिवसेना नगरसेवक (Shiv Sena Corporator)  मिलिंद वैद्य  ( Milind Vaidya यांनी कोंबडी विक्रेत्यांना मारहाण केल्याचा प्रकार पुढे येत आहे. या प्रकाराच एक व्हिडिओही व्हायरल झाला असून, या व्हिडिओत नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यासह आणखी काही लोक कोंबडी विक्रेत्यांना मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना माहिम (Mahim)  येथील मच्छीमार कॉलनी येथे घडल्याचे समजते.

काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी एका सरकारी अभियंत्याला मारहाण करत त्याच्या अंगवार चिखल टाकल्याची घटना ताजी असतानाच मुंबई शहरातील शिवसेना नगरसेवकाचाही आणखी एक प्रताप पुढे आला आहे.

साधारण 1 मिनिट 5 सेंकंद इतक्या कालावधीचा असलेल्या या व्हायरल व्हिडिओत शिवसेना नगरसेवक काही चिकन व्यापाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.  प्राप्त माहितीनुसार, मच्छीमार कॉलनी येथे रेल्वे स्टेशन जवळ काही कोंबडी विक्रेते हे कोंबड्यांनी भरलेली वाहने उभी करत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे नगरसेवक वैद्य हे कोंबडी विक्रेत्यांवर नाराज होते, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ (Video))

एएनआय व्हिडिओ

दरम्यान, या कोंबडी विक्रेत्यांना इथे गाड्या लावू नयेत हे सांगण्यासाठी गेलेल्या मिलिंद वैद्य यांनी विक्रेत्यांना थेट चोपच दिल्याची चर्चा रंगली आहे. दरम्या, व्हिडिओत दिसते की, मार बसू लागताच काही कोंबडी विक्रेते हे मोठमोठ्याने ओरडत आहेत. तरीही वैद्य आणि त्यांचे सहकारी कोंबडी विक्रेत्यांना मारहाण करत आहेत. उपस्थितांपैकी काही लोक कोंबडी विक्रेत्यांच्या गाडीतील साहित्याची तोडफोड आणि फेकाफेक करतानाही दिसत आहे.

दरमयान, सोशल मीडियावर या व्हिडिओवरुन मिलिंद वैद्य यांच्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.