Shiv Sena: 'मातोश्री' समोर या, शिवसैनिकांकडून महा'प्रसाद' घेऊन जा; युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा राणा दाम्पत्यास इशारा

इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' (Matoshri) येथे जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार असेही म्हटले.

Ravi Rana, Navneet Rana, Varun Sardesa | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरुन अमरावती येथील खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शिवसेनेला आव्हान दिले. इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' (Matoshri) येथे जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार असेही म्हटले. त्यामुळे खवळेल्या शिवसैनिक आज मातोश्रीवर जमला आहे. युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई (Varun Satish) यांनी तर थेट राणा दाम्पत्याला इशाराच दिला आहे. 'राणा दाम्पत्याने मातोश्रीवर यावे आणि शिवसैनिकांकडून महाप्रसाद घेऊन जावे', असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

राणा दाम्पत्याने आव्हानावर दिल्यानंतर शिवसैनिकही पेटून उठल्याचे चित्र आहे. वरुण देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, 'मातोश्री' आणि शिवसेना भवन हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धास्थानाला जर कोणी आव्हान देत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. आमच्या देवळावर आक्रमण कराल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरणारच. राणा दाम्पत्य प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तारखा देत आहे. वारंवार तारखा काय देता. एकदाच तुम्ही या आणि महाप्रसाद घेऊन जा. काही लोक सांगत आहेत की ते गणीमी कावा वापरणार आहेत. गनिमी कावा कशाला म्हणायचा आणि पळपुटे कावा कशाला म्हणायचा? हे प्रसारमाध्यमांनीही ठरवायला हवे, असे वरुण सरदेसाई म्हणाले. (हेही वाचा, Navneet Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांचा पहारा; नवनीत राणा यांना पोलिसांकडून 149 अन्वये नोटीस)

आज देश आणि महाराष्ट्रासमोरही मोठे प्रश्न आहेत. महागाई, बेकारी, इंधन दरवाढ असे अनेक मुद्दे आहेत. मात्र, या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्यासाठी काही लोकांना पुढे करुन असे काहीतरी उकरुन काढतात. शिवसेना कधीही कोणाच्या अंगावर जात नाही. पण कारणाशिवाय उगाच कोणी अंगावर आले तर सोडतही नाही. त्यामुळे शिवसेनेला डिवचू नका. जर कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर शिवसेना त्यांना चोख प्रत्युत्तर देईल. त्यामुळे त्यांनी यावे आणि प्रसाद घेऊन जावे, असा इशाराच सरदेसाई यांनी दिला आहे.