शिवनेरी येथील माती घेऊन उद्धव ठाकरे आयोध्येला पुन्हा जाणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचेही केले स्वागत

मी काही दिवसांपूर्वीच अयोध्येला गेले होतो. अयोध्या हे एक प्ररणास्थान आहे. तेथील वातावरणात एक सकारात्मकता आहे. अशा वातावरणात मी शिवनेरी येथील पवित्र माती घेऊन गेलो होतो. या मातीचाच चमत्कार म्हणून की काय अयोध्या जमीन वाद प्रकरणाचा निकाल लागला, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Shiv Sena chief Uddhav Thackeray | (Photo Credits: ANI)

Ayodhya Judgment: आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे.  न्यायदेवतेला दंडवत. न्यायालयाचा निर्णय आला आणि अनेक वर्षांचा वाद अखेर संपला. आजच्या या आनंदाच्या दिवशी बाळासाहेबांची आठवण येणे स्वाभाविक आहे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) अयोध्या जमीन वाद (Ayodhya Land Dispute) प्रकरणी दिलेल्या निकालाचे स्वागत केले.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या निकालाचा संबंध शिवनेरी येथील पवित्र मातीशी जोडला. मी काही दिवसांपूर्वीच अयोध्येला गेले होतो. अयोध्या हे एक प्ररणास्थान आहे. तेथील वातावरणात एक सकारात्मकता आहे. अशा वातावरणात मी शिवनेरी येथील पवित्र माती घेऊन गेलो होतो. या मातीचाच चमत्कार म्हणून की काय अयोध्या जमीन वाद प्रकरणाचा निकाल लागला, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, आज बाळासाहेब असायला हवे होते! अयोध्या निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया)

एएनआय ट्विट

दरम्यान, येत्या काही काळात पहिल्यांदा मी शिवनेरी येथे जाईल. तेथून पुढे अयोध्येला जायचा आपला विचार असल्याचेही ठाकरे यांनी बोलून दाखवले. दरम्यान, या वेळी राजकारणाच्या कोणत्याही मुद्द्यावर बोलणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी नजीकच्या काळात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.