Uddhav Thackeray Meets Rahul Gandhi: दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींची घेतली भेट; विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भेटीला विशेष महत्त्व (See Pics)

आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील उपस्थित होते.

Photo Credit- X

Uddhav Thackeray Meets Rahul Gandhi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut)देखील उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल सुद्धा या भेटीवेळी उपस्थित होते. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानीच ही भेट झाली असल्याचे फोटो समोर आले आहेत. (हेही वाचा:Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा; 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात )

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहेत. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandh)यांच्यासोबतची ही भेट आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते. दोन्ही नेत्यांच्या या भेटीत विधानसभा निवडणुकांसाठी काही महत्त्वाची चर्चा झाली का? याबाबत बोललं जात आहे. कारण विधानसभा निवडणूका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवरून मतभेद झाले होते. मतदानाला अवघे काही दिवस असतानाही उमेदवारांची नावे जाहीर झाली नव्हती. ते विधानसभेत होऊ नये, म्हणून या भेटीत त्यावर चर्चा होऊ शकते. या अनुशंगाने तर ही भेट झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरे-राहुल गांधी यांची दिल्लीत भेट

लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढवली होती. आगामी काळात विधानसभा निवडणूकही एकत्रित लढायची तयारी तिन्ही पक्षांनी दर्शवली आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे.