Shiv Sena Jan Ashirwad Yatra: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जन आशीर्वाद यात्रेतील हटके फोटो
कदाचित शिवसेनेने हा बदल स्वीकारला असावा. त्यामुळेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना आपले दुसऱ्या क्रमांकाचे सेनापती केले असावे. महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांना आता गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. तसेच, भविष्यातील मुख्यमंत्री म्हणूनही आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
Aditya Thackeray Jan Ashirwad Yatra Photo: शिवसेना आयोजित जनआशीर्वाद यात्रा (Shiv Sena Ashirwad Yatra) नेतृत्व करत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेला शिवसेना पक्ष कार्यकर्ते (ज्याला शिवसेनेच्या भाषेत शिवसैनिक म्हणतात) उत्साहाने पाठिंबा देत आहेत. यात्रेत सहभागी होत आहेत. शहरी चेहरा असलेले नेतृत्व अशी असलेली प्रतिमा पुसण्यास आदित्य ठाकरे या यात्रेच्या निमित्ताने यशस्वी होणार का? याचे उत्तर भविष्यातच मिळेल. पण, सध्या तरी, छोट्या ठाकरे यांचे महाराष्ट्रात स्वागत केले जात आहे. हे स्वागतही हटके आहे. कधी खास धनगरी वेश, तर कधी हतात रुमणे देऊन त्यांचे स्वागत होत आहे. आदित्य ठाकरे यांचे पारंपरीक वेशात (Aaditya Thackeray welcomed in traditional way) केले जाणारे स्वागत काहीसे हटके दिसत आहे. या जन आशीर्वाद यात्रेतील आदित्य ठाकरे यांचे हे काही हटके फोटो.
लोकसभा निवडणूक 2014 नंतर भारताच्या आणि विधानसभा निवडणूक 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत काहीसा बदलताना दिसतो आहे. फारशी संधी मिळत नसली तरी, देशभरातील तरुण राजकारणात येऊ पाहतो आहे. कदाचित शिवसेनेने हा बदल स्वीकारला असावा. त्यामुळेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना आपले दुसऱ्या क्रमांकाचे सेनापती केले असावे. महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांना आता गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. तसेच, भविष्यातील मुख्यमंत्री म्हणूनही आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे. (हेही वाचा, आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्यामध्ये पुन्हा एकदा गाठभेट, सोशल मीडियात चर्चांना उधाण)
कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर
जन आशीर्वाद यात्रा - श्री शिवाजी हायस्कूल, नेर
जन आशीर्वाद यात्रा एक क्षण
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमानी अनेक प्रश्न विचारले. यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप (Shiv Sena BJP) खरोखरच युती करुन सामोरी जाणार का? येथून ते थेट आपण भविष्यातील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री (CM and Deputy CM) पदाचे उमेदवार असणार का? इथपर्यंतच्या अनेक प्रश्नांचा समावेश आहे. पण, आदित्य ठाकरे यांनी मोठ्या खुबीने या प्रश्नांची उत्तरे देत हे विषय टोलावून लावले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस येथे विजय संकल्प मेळावा
धनगर समाज बांधवांकडून जन आशीर्वाद यात्रा दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे स्वागत
नांदगाव, खंडेश्वर येथे जन आशीर्वाद यात्रा, एक क्षण
कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर येथे बैलगाडीत आदित्य ठाकरे
दरम्यान, संजय राऊत यांच्यापासून ते शिवसेनेतील इतर अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडतील असे जाहीरपणे म्हटले आहे. तर, दिग्रसचे विद्यमान आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी आदित्य यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी मात्र आमदार राठोड यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.