Shiv Jayanti 2023: शिवनेरी वर VIP साठी शिवभक्तांना का अडवता? जाहीर कार्यक्रमात छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांसामोर मांडली व्यथा

त्यानंतर शासकीय कार्यक्रमाच्या मंचावर न जाता राजे शिवभक्तांसोबत थांबले होते.

Shivneri | Twitter/Sambhaji Chhatrapati

किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज (19 फेब्रुवारी) आज पार पडला आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी गर्दी करत असतात. सर्वसामान्यांच्या या उत्साहाला मागील काही वर्ष ब्रेक लागत होता तो शासकीय नियमावलींचा. सामान्य शिवभक्तांना शिवनेरी वर शिवाई मंदिरात,  जन्मस्थळाजवळ दर्शन मिळत नव्हतं. हीच व्यथा आज शासकीय कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Chhatrapati) यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलून दाखवली. त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेत पुढील वर्षीपासून सामान्य शिवभक्तांची अडवणूक होणार नसल्याचं जाहीर केले आहे.

दरम्यान छत्रपती संभाजी राजे शिवनेरी वर येत असताना काहींनी त्यांना अडवणूक सामान्य शिवप्रेमींना दिल्या जाणार्‍या दुय्यम वागणूकीच्या प्रकाराची जाणीव करून दिली. त्यानंतर शासकीय कार्यक्रमाच्या मंचावर न जाता राजे शिवभक्तांसोबत थांबले होते. त्यांनी त्यांच्या गराड्यातच माईकवरून आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. शिवप्रेमींनाही शांत करत शासकीय कार्यक्रम सुरळीत पार पडू द्यावा यासाठी आवाहन केले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भाषणं सुरळीत पार पडली. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही पुढील वर्षीपासून सामन्यांची अडवणूक होणार नसल्याचं जाहीर केले आहे. नक्की वाचा: Shiv Jayanti 2023: महाराष्ट्र राज्यपाल Ramesh Bais यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या Shivaji Park वरील पुतळ्याला मानवंदना .

युवराज छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी भाजपाच्या पाठिंब्याने राज्यसभेत खासदारकी निभावली होती. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी देखील ठोस भूमिका घेत लोकांना एकत्र बांधून पण संयमाने आरक्षण मिळवण्यासाठी लढा पुकारला होता.