Shirdi Murder Case: जावयाकडून हल्ला, मेहुणी जखमी; पत्नी, मेहुणा आजेसासूची हत्या; शिर्डी येथील घटना

सुरेश याचा पत्नीशी असलेल्या असलेल्या भांडणावरुन सासुरवाडीतील लोकांशी जूना वाद होता. पाठिमागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या वादाचे पर्यावसन हत्तेत झाले. त्याने केलेल्या हल्ल्याध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मेहूणी गंभीर जखमी झाली आहे.

Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi Murder Case) येथील सावळीविहीर गाव हादरून गेले आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे.  कुटुंबीयांचा जावई असलेल्या सुरेश निकम याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरेश याचा पत्नीशी असलेल्या असलेल्या भांडणावरुन सासुरवाडीतील लोकांशी जूना वाद होता. पाठिमागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या वादाचे पर्यावसन हत्तेत झाले. त्याने केलेल्या हल्ल्याध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मेहूणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपी सुरेश निकम याला पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी माहेरी राहात असे. त्यातून त्यांच्यात वाद होता. या वादातून आरोपी पत्नीच्या माहेरच्या घरात घुसला आणि त्याने धारधार शस्त्राने हल्ला केला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने पीडितांना बचावासही वेळ मिळाला नाही. यामध्ये मेहुणी कशीबशी वाचली आहे. मात्र, तिचीही प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा धाकल केला आहे.

मृतांची नावे

मृत पत्नी वर्षा नियकम हिच्या भावाच्या पत्नी श्वेता गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश निकम हा मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसला. त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच त्याने हातातील धारधार शस्त्राने सर्वांवर वार करण्यास सुरुवात केली. कोणाला काही कळण्याच्या आतच हा हल्ला सुरु झाल्याने कोणालाच बचाव करता आला नाही. अवघ्या पाच ते सहा मिनीटांमध्ये हा सर्व प्रकार घडला. तो इतका बेभान झाला होता की, दिसेल त्याच्यावर तो वार करत होता. आरोपीला शक्य तितक्या लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.