शेअर बाजारत पुन्हा खळबळ; सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला
सद्यस्थितीला गुंतवणूक कंपन्यांपासून काहीसे दूरच राहा असा सल्ला शेअर मार्केटचे अभ्यासक देत आहेत.
सुमारे १०००अंकांनी शुक्रवारी घसरलेल्या शेअर बाजारात सोमवारीही अशीच खळबळ पहायला मिळाली. पडझडनेच सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण पहायला मिळाली. एक वेळ तर अशी आली सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला. तर, निफ्टीत १५० अंकांची घसरण झाल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, सध्या स्थितीत सेन्सेक्स ४४८.५ अंकाच्या घसरणीसोबत ३६,३९२ आणि निफ्टी १३७ अंकांच्या घसरणीसोबत ११,००५वर आहे. बँकींग सेक्टरबाबत विचार करायचा तर, अॅक्सीस बँक, एस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आदी बँकांमध्ये जोरदार घसरण पहायला मिळाली. योसबतच कोल इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील, सन फार्मा, रिलायन्स, भारती एअरटेल, टीसीएसची स्थितीही फार चांगली नाही. दरम्यान, सद्यस्थितीला गुंतवणूक कंपन्यांपासून काहीसे दूरच राहा असा सल्ला शेअर मार्केटचे अभ्यासक देत आहेत. तसेच, येत्या ८ ते १० दिवसांमध्ये बाजारात मोठे चढ उतार पहायला मिळतील असेही निरिक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.
गुंतवणूकदारांकडून होत असलेली शेअर्सची विक्री हे घरणीचे मोठे कारण मानले जात आहे. आयटी आणि टेक क्षेत्र सोडल्यास रिअल, ऑटो, बँक, फायनान्स, टेलिकॉम, हेल्थकेयर आदी. क्षेत्रांमध्ये स्टॉक्समधील विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण हेसुद्धा शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.