Sharad Pawar च्या हस्ते PM Narendra Modi यांचा 1 ऑगस्टला 'लोकमान्य टिळक पुरस्कार' देऊन गौरव करण्यावर 'INDIA' चे काही नेते नाराज
Indian National Developmental Inclusive Alliance ची तिसरी बैठक मुंबई मध्ये 25,26 ऑगस्ट दिवशी आयोजित करण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितीतही एनसीपी नेते आणि अध्यक्ष शरद पवार 1 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने INDIA च्या काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रिपोर्ट्सनुसार काही नेत्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे देखील शरद पवारांची बोलून या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी न लावण्याबाबत बोलणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे.
1 ऑगस्ट दिवशी पुण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा 'लोकमान्य टिळक पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा सन्मान शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून या पुरस्काराबाबत आधीच नाराजी व्यक्त झाली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपा विरोधी एकत्र भूमिका घेण्यासाठी समविचारी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांच्या भाजपा विरोधी अजेंडा असताना नरेंद्र मोदींचाच सत्कार शरद पवार यांनी करावा हे चूकीचं ठरेल असं काही INDIA नेत्यांचं म्हणणं आहे. यामुळे लोकांमध्येही चूकीचा संदेश जाईल असेही त्यांना वाटत आहे.
पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच विरोधकांच्या या एकजुटीला 'INDIA' नाव देण्यावरून कडाडून टीका केली आहे.
1 ऑगस्टला टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून आयोजित सन्मान सोहळ्यात शरद पवारांना मुख्य अतिथीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या हस्ते मोदींचा सन्मान होणार आहे. तर मुंबईतील 25, 26 ऑगस्टच्या INDIA च्या सभेचं आयोजन मुंबईत ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडूनच करण्यात आले आहे.