Cyrus Poonawalla यांचा गौरव 'भारत रत्न' पुरस्काराने व्हावा; शरद पवार यांची सरकार कडे मागणी

नंतर पद्म भूषण देण्यात आला. पण सरकारने त्यांना केवळ पद्म भूषण पुरता मर्यादित न ठेवता त्यांचा गौरव भारत रत्न पुरस्काराने व्हावा अशी इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे.

Pawar Poonawala | Twitter

लस निर्मितीमध्ये सीरम इन्स्टिट्युट (Serum Institute of India) कडून केलं जाणार काम पाहता शरद पवार यांनी सीरम च्या  साइरस  पूनावाला (Cyrus Poonawalla) यांचा गौरव भारतरत्न (Bharat Ratna Award) देऊन करण्यात यावा अशी मागणी केली आहे. काल पुण्यामध्ये एका समारंभामध्ये बोलत असताना सायरस यांच्या उपस्थिती मध्येच त्यांनी ही मागणी बोलून दाखवली आहे. कोविड सह अनेक आजारांमध्ये सीरम च्या लसी कशा प्रभावी ठरत आहेत याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

जगात 5 मुलांचा जन्म होत असेल तर किमान तिघांना सीरमची लस दिली जाते. कोविड सारख्या जागतिक आरोग्य संकटकाळामध्ये सीरम ने जगाला लस पुरवठा केला. प्रामुख्याने आफ्रिकेतील देशांना लसी पुरवल्या. मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती आणि पुरवठा करण्यामध्ये सायरस पूनावाला आणि त्यांच्या टीमचा सहभाग आहे. लस निर्मितीच्या क्षेत्रात त्यांचं काम वाखाण्याजोगं आहे. सुरूवातीला भारत सरकार कडून त्यांना पद्मश्री देण्यात आला. नंतर पद्म भूषण देण्यात आला. पण सरकारने त्यांना केवळ पद्म भूषण पुरता मर्यादित न ठेवता त्यांचा गौरव भारत रत्न पुरस्काराने व्हावा अशी इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे.

सायरस पूनावाला यांचं लस निर्मितीमधील योगदान, त्यांनी देश, जग आणि माणूसकी मधून केलेलं काम पाहता त्यांचा गौरव भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देऊन करावा या माझ्या मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करेल असे शरद पवार म्हणाले आहेत. Bharat Ratna: 'बाळासाहेब ठाकरेंनाही मिळायला हवा भारतरत्न'; Raj Thackeray यांची केंद्र सरकारकडे मागणी .

सायरस पूनावाला हे 82 वर्षीय आहेत. ते सायरस पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. सायरस पूनावाला आणि शरद पवार हे वर्गमित्र आहेत. पुण्यात BMCC कॉलेज मध्ये ते एकत्र होते.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif