महाराष्ट्रात राजकीय पेच प्रसंगावर शरद पवार यांचं मोठं विधान- शिवसेना -भाजपानं लवकर सरकार स्थापन करावं
शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीने सरकार स्थापन करावं असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. महायुतीमध्ये नवा प्रस्ताव येणार किंवा जाणार नाही असे आज संजय राऊत यांनी सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादी शिवसेना यांच्यामध्ये काय राजकीय गणितं जमणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदे मध्ये महाराष्ट्रातील पेच प्रसंगावर वक्तव्य केलं आहे. राज्यातील पोलिसांच्या समस्ये पासून त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली स्थानिकांनी सहकार आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकारने विचार करावा. विशिष्ट मर्यादे पर्यअसे त कर्जमाफी मिळावी असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच अअयोद्धा वाद प्रकरणी निकाल लागल्यानंतर शांतता राखणे आवश्यक असल्याचे सांगत पवारांनी न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करायला हवा असे आवाहन भारतीयांना केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बसणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीने सरकार स्थापन करावं असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी कोणताही प्रस्ताव आणला नसल्याचं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्य मंत्रिपदामध्ये रस नसल्याचं ही शरद पवार आज म्हणाले आहेत. तसेच सोनिया गांधी यांच्या सोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. 2-3 दिवसांमध्ये काय होतंय ते बघू त्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र शरद पवार विरोधी पक्षात बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना भाजपावर अजून कोणत्याच प्रस्तावावर चर्चा झालेली नाही. शिवसेना समान सत्ता वाटपावर ठाम असल्याने आता पुढची रणनिती काय असेल याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळेस मतदारांचा कौल हा आपल्याला विरोधी पक्षात बसण्याचा असल्याने तोच कायम असेल असे सांगण्यात आले होते. मात्र आता शिवसेना - राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यासाठी शिवसेनेने आधी भाजपाची साथ सोडावी असा प्रस्तावदेखील समोर आल्याचं म्हटलं आहे.