Sharad Pawar on Jalna Lathicharge: सरकारच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
सर्व स्तरातून पोलीस आणि सरकारच्या या कृतीचा निषेध केला जात आहे.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांवर जालना (Jalna) येथे झालेल्या लाठीमारावरुन राज्यभरात वातावरण तापले आहे. सर्व स्तरातून पोलीस आणि सरकारच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. नागरिकांमधूनही तीव्र संताप अनावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान येथील घटना गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. हवा तसा बळाचा वापर जालना येथील घटनेत करण्यात आला. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. (हेही वाचा - Nanded Maratha Kranti Morcha: सोमवारी नांदेड बंदची हाक, सकल मराठा समाजाकडून घोषणा)
आज आम्ही तिघांनी इथे हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट दिली, जखमी लोकांना भेटलो. आश्चर्य वाटेल असा बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. हवेत गोळीबार करून ज्वारीच्या आकाराचे छरे जखमींना लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात, त्या मंत्रिमंडळात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले.