IPL Auction 2025 Live

Sharad Pawar Jalna visit today: शरद पवार यांचा आज जालना दौरा; लाठीमार पीडित आंदोलक आणि अंतवरली सराटी ग्रामस्थांची घेणार भेट

ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आंदोलकांना भेट देणे अपेक्षीत आहे. तसेच, ते अंबड रुग्णालय येथे जाऊन जखमींचीही भेट घेणार असल्याचे समजते.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

मराठा आरक्षण मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलिसांनी तीव्र लाठीमार केला. ज्याचे पडसदा अखंड महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात जोरदार उमठले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज याच आंदोलकांची (Jalna Maratha Reservation Protest) भेट घेणार आहेत. ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आंदोलकांना भेट देणे अपेक्षीत आहे. तसेच, ते अंबड रुग्णालय येथे जाऊन जखमींचीही भेट घेणार असल्याचे समजते. आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक उपोषणास बसले असता पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून निषेध होत आहे.

शरद पवार जालना दौरा

इंडिया आघाडीची एक बैठक मुंबई येथे नुकतीच पार पडली. या बैठकी नंतर विरोधी पक्षांची एक पत्रकार परिषद पार पडली. त्यानंतर पुढच्या अवघ्या काहीच तासात वृत्त आले की, जालना येथील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे या घटनेची महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली.

सांगितले जात आहे की, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण हे पाठिमागील 29 ऑगस्ट पासून आरक्षणाची मागणी करत आंदोलन करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते हे आंदोलक आपल्या मागण्या आणि भूमिकांवर ठाम होते. अशा वेळी त्यांची प्रकृती खालावण्याची भीती होती. दरम्यान, उपोषण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, त्यास आंदोलकांनी विरोध केला. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात मोठा संघर्ष झाला. त्यात पोलिसांकडून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात हा वाद आणखी वाढला परिणामी पोलिसांनी लाठीमार केला.