शरद पवार यांना सत्तास्थापनेसंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत ठराव मंजूर
दरम्यान या पार्श्वभूमिवर लवकरच काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जून खडगे, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल तसेच, अहमत पटेल यांच्यात बैठक पार पडू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचे निवडून आलेले सर्व 54 आमदारांची एक बैठक वाय.बी. सेंटर, मुंबई येथे आज (मंगळवार, 12 नोव्हेंबर) पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष आणि इतर पक्षांसोबत सरकार स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, सध्यास्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अपेक्षित बहुमत नाही. बहुमताचा आकडा जुळवायचा तर आमच्या आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस सोबत चर्चा करावी लागेल. आजच्या स्थितीतमध्ये सरकार स्थापन करायचे तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यासाठी अपेक्षीत अवधी मिळायला हवा, असेही मलिक यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता)
एएनआय ट्विट
एएनआय ट्विट
दरम्यान, सरकार स्थापन करण्यासंबंधी एखादी समिती स्थापन करण्यासंबंधीचे अधिकारही पवार यांना देण्यात आल्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आले, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान या पार्श्वभूमिवर लवकरच काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जून खडगे, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल तसेच, अहमत पटेल यांच्यात बैठक पार पडू शकते.