Sharad Pawar Heath Update: शरद पवार यांना Breach Candy रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

या वेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पवार यांना डिस्चार्ज (Sharad Pawar Discharged) मिळाला असला तरी डॉक्टरांकडू पुढील 15 दिवस सक्तीने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरद पवार हे डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयातून थेट आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार हे ब्रिच कँडी रुग्णालयात 30 मार्च रोजी दाखल झाले. ते रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी सर्व तपासण्या करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीला आराम पडला. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा, Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती स्थिर; पित्ताशयातील खडा काढला पण डॉक्टरांनी व्यक्त केली अजून एका शस्त्रक्रियेची शक्यता)

दरम्यान, शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतू, 15 दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पवार यांन पुढचे 15 दिवस सक्तीने विश्रांती घ्यावी लागणार आहे. शरद पवार हे घरीच विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या बंगल्याभोवती सुरक्षाही वढविण्यात आली आहे.