IPL Auction 2025 Live

Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

परंतू, आम्ही एकत्र येत राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले.

Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात एक बैठक झाली. व्यक्तीगत पातळीवर भेट झाल्याने या भेटीची जोरदार चर्चा रंगली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तर 'आमची वाघासोबत दुश्मनी कधीच नव्हती. वाघासोबत दोस्ती करायाल आम्ही केव्हाही तयार आहोत', असे सूचक विधान केले. या चर्चांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. हे विधान शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Sena-NCP Alliance) पक्षाच्या संभाव्य युतीबाबत आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन पक्षांच सरकार स्थापन करुन आपण एकत्र काम करु असे कोणालाही वाटले नव्हते. परंतू, आम्ही एकत्र येत राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. हे सरकार चांगले काम करते आहे. त्यामुळे हे सरकार पुढची पाच वर्षे टीकेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, पंतप्रदान आणि मुख्यमंत्री एकत्र भेटले की लगेच काही लोक वेगवेगळे शंका घेऊ लागले. आपण शिवसेनेसोबत कधी काम केले नाही. परंतू, शिवसेनेलाही महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पाहात आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस केवळ सरकारमध्येच नव्हे तर विधानसभा, लोकसभेतही एकत्र काम करेल आणि सामान्य जनतेचे नेतृत्व राज्य आणि देशात करेल, असे पवार म्हणाले. (हेही वाचा, Shiv Sena-BJP: ठाकरे-मोदी भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेला ऑफर 'आम्ही कधीही तयार आहोत')

दरम्यान, शरद पवार यांनी या वेळी एक आठवणही सांगितली. देशात जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. या वेळी अडचणीत असलेल्या काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एकही पक्ष पुढे आला नाही. केवळ शिवसेना नेतृत्व पुढे आले. इतकेच नव्हे तर आगामी काळात झालेल्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देईन असा शब्दही शिवसेना नेतृत्वाने इंदिरा गांधीयांना दिला. इतकेच नव्हे तर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नाही. दिलेला शब्द पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली, शक्यता वर्तवली तरी शिवसेनेने त्या काळात जशी भूमिका घेतली, तशीच भूमिका शिवसेना सोडेल असे कोणी सांगत असेल तर तसे अजिबात होणार नाही, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी या वेळी इतरही अनेक विषयांवर भाष्य केले. पक्षाच्या नाजूक काळात अनेक लोक सोडून गेले. परंतू, त्यामुळे नवं नेतृत्वही तयार झालं. नवे नेतृत्व तयार झाले तर समाजातील विविध घटकांना आपणही सत्तेतील भाग आहोत असे पवार म्हणाले. शिवभोजन थाळी उपक्रमाबाबत मला शंका होती. परंतू, तो कार्यक्रमही राज्यात चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. या वेळी शरद पवार यांनी राजेश टोपे यांचे विशेष कौतुक केले.