Sharad Pawar आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे एकाच व्यासपीठावर?

पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात वितरीत होणाऱ्या टिळक पुरस्कारासाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासापीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi Vs. Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Tilak Smarak Mandir Trust: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राष्ट्रीय भ्रष्टवादी पक्ष म्हणून राष्ट्रीय व्यासपीठावरुन अनेकदा हिनवले आहे. त्यातच मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांचे राजकारण हे त्यांच्या कन्येसाठी सुरु आहे आणि त्यांच्या पक्षात भ्रष्टाचारी लोक असल्याच्या आशयाचे विधान केले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रुपात राष्ट्रवादीत बंड झाले. अजितदादा गटाने भाजपशी हातमिळवणी करत सत्तासोपान चढला. इतक्या सगळ्या घडामोडी घडल्यावर पुणे येथील कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासापीठावर दिसणार का? अशी सवालयुक्त उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

निमित्त आहे टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याचे. पुण्यातील एका संस्थेकडून पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शरद पवार यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण आहे. मात्र, मधल्या काळात भाजप-राष्ट्रवादी आणि महाराष्ट्राती ताणलेले संबंध लक्षात घेता राजकीय वर्तुळात उत्सुकता सुरु आहेत. अर्थात राजकीय संघर्ष, टीका टिप्पणी आणि व्यक्तीगत संबंध यांमध्ये शरद पवार अंतर येऊ देत नाहीत. आजवर असे कधी घडले नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतमतांतरे होऊन फूट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या विविध चर्चांना उधान आले आहे.

दुसऱ्या बजूला महाआघाडी 'इंडिया'चे शिल्पकार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. संसदेचे पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार दिल्ली येथील अधिकार्यांचया पदस्थापना आणि बदल्या यांच्याशी संबंधीत एक विधेयक मांडत आहे. हे विधेयक मंजूर होऊ नये यासाठी विरोधकांनी ताकद लावली आहे. त्यासाठी काँग्रेसने तर आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. अशा वेळी प्रत्येक मत महत्त्वाचे असताना शरद पवार काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. ते विरोधकांच्या बाजूने व्यक्त होण्यासाठी संसदेत असणार की, पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी लावणार? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, हा कार्यक्रम उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पुणे येथे पार पडतो आहे.