Shahale Mahotsav at Dagdusheth temple: वैशाख पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शहाळे महोत्सव साजरी; 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य (Watch Video)
दगडूशेठ गणपतीला तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
Shahale Mahotsav at Dagdusheth temple: वैशाख पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे (coconut) महोत्सव साजरी करण्यात आला. दगडूशेठ गणपती(Dagdusheth Ganapati)ला तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पहाटे 3 वाजता गणपती बाप्पाला ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर 4 वाजता प्रख्यात गायकांकडून स्वराभिषेक कार्यक्रम सादर करण्यात आला. (हेही वाचा: Buddha Purnima in Bodhgaya: भगवान बुद्धांच्या 68 व्या जयंतीनिमित्त बोधगया येथे भव्य मिरवणूकीचे आयोजन, मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती (Watch Video))
वैशाख पौर्णिमा इतक्या थाटामाटात साजरी करण्याचे कारण म्हणजे, शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी गणपती अवतरले. दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो.
भाविकांची पहाटेपासून मंदीरात गर्दी पहायला मिळत आहे. भाविकांकडून मोदकांचा, लाडूंचा गोड नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात येत आहे.