Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरी पाठवले Sex Toys, मुंबईतील तरुणास अटक

एका 21 वर्षीय तरुणीच्या घरी सेक्स टॉईज (Sex Toys) पाठवत असल्याचा या तरुणावर आरोप आहे. या तरुणाचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला प्रेमाबाबत विचारणा केली परंतू तिने नकार दिला. त्यातून निर्माण झालेल्या रागाच्या भावनेतून तरुणाने हे कृत्य केल्याची प्राथमीक माहिती आहे.

Arrested

सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) मुंबई (Mumbai) येथून एका तरुणास अटक केली आहे. एका 21 वर्षीय तरुणीच्या घरी सेक्स टॉईज (Sex Toys) पाठवत असल्याचा या तरुणावर आरोप आहे. या तरुणाचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला प्रेमाबाबत विचारणा केली परंतू तिने नकार दिला. त्यातून निर्माण झालेल्या रागाच्या भावनेतून तरुणाने हे कृत्य केल्याची प्राथमीक माहिती आहे. हा तरुण ई- कॉमर्स वेबसाइटवरुन सेक्स टॉईज मागवत असे व तरुणीच्या घरी पाठवत असे. तरुणाने पीडित तरुणीचा मोबाईल नंबरही पॉर्न साईटवर अपलोड केल्याची माहिती आहे. घडला प्रकार लक्षात येताच तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 26 वर्षांचा तरुण आहे. त्याच्यावर विद्यार्थीनिचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ज्या कुरीअर कंपनीच्या माध्यमातून हा तरुण सेक्स टॉईज पाठवत असे त्याबाबतही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सायबर पोलिसांनी या तरुणाचा माग व्हिपीएनच्या (व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) माध्यमातून तपास करत काढला. या वेळी पोलिसांना आढळून आले की, आरोपी जेव्हा जेव्हा ही पार्सल तरुणीच्या घरी पाठवत असे तेव्हा तो प्रत्येक वेळी आयपी अॅड्रेस बदलत असे. पीडित तरुणी ही आरोपीच्या शेजारी राहते. तसेच, आरोपीकडे पीडितेचा मोबाईल क्रमांकही होता. (हेही वाचा, Oral Sex: महिला ओरल सेक्स म्हणजेच ब्लोजॉब देण्यासाठी का करतात टाळाटाळ? जाणुन घ्या यामागची कारणे)

धक्कादायक म्हणजे आरोपीने एका पॉर्न साईटवर तरुणीचा मोबाईल क्रमांक अपलोड केला होता. त्यामुळे विविध फोन नंबर्सवरुन तरुणीला फोन येत. या फोनमधील भाषा अतिशय गलिच्छ असे. आरोपी येवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने पीडितेचा मोबाईल क्रमांक एका सेक्स टॉईज विकणाऱ्या कंपनीलाही दिला होता. तरुणीच्या घरी सेक्स टॉईज पाठवल्यावर एका ऑर्डरदरम्यान, आरोपीने कॅश ऑन डिलिव्हरी देण्यासही सांगितले होते. या संबंध प्रकाराबाबत पीडित तरुणीने मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शताफीने आरोपीला अटक केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif