Mumbai: मुंबईतील धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न, एका महिलेस अटक
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडशी संबंधित अनेक धक्कादायक प्रकरण समोर येऊ लागले आहेत.
Sex Racket Busted In Mumbai: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडशी संबंधित अनेक धक्कादायक प्रकरण समोर येऊ लागले आहेत. याचदरम्यान, एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वेळीच छापा टाकून तिची सुटका केली असून याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. संबंधित अभिनेत्रीची 4 लाखात विक्री केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसायाकरता आणण्यात आले होते. 4 लाख रुपये घेवून वेश्या व्यवसाय केला जात होता. यासंदर्भात माहिती मिळाताच पोलिसांनी छापा टाकत मुंबईतील सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला. तसेच अभिनेत्रीचा सौदा करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. सांताक्रुझ पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखा 7 नेही कारवाई केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृ्त्त दिले आहे. हे देखील वाचा- Amravati: पोलीस ठाण्यातच आरोपीची गळफास लावून आत्महत्या, अमरावती येथील घटना
याआधीही मराठी आणि हिंदीतील काही मॉडेल अडकल्याची प्रकरणे समोर आली होती. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे. त्यावेळी पोलिसांनी 3 महिलांची सूटका केली होती. तसेच सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)