Sex Racket Busted in Thane: बोर्डवर स्पा सेंटर, आत सेक्स रॅकेट; ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश, व्यवस्थापकाला अटक

या प्रकाराबाबत ठाणे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातरजमा करुन कारवाई केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश (Sex Racket Busted in Thane) केला.

Sex Racket Busted in Thane | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

स्पा सेंटर (Spa Center) असा बोर्ड लावून ग्राहकांना आकृष्ट करायचे आणि आतमध्ये सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवायचे असा प्रकार ठाणे येथे सुरु होता. या प्रकाराबाबत ठाणे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातरजमा करुन कारवाई केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश (Sex Racket Busted in Thane) केला. ठाणे येथील एका स्पा सेंटरमध्ये (Sex Racket in Spa Center) हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांची सुटका केली तर व्यवस्थापकाला अटक केली आहे.

स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांन मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक डमी ग्राहक पाठवत आपल्या पद्धतीने खातरजमा करुन घेतली. स्पा सेंटर व्यवस्थापनाने पोलिसांनी पाठवलेल्या डमी ग्राहकास एका सेशनसाठी पाच हजार रुपये आकारले. हा व्यवहार पक्का झाल्यानंतर या ग्राहकांना पोलिसांना माहिती देऊन व्यवहार निश्चित झाल्याचे पोलिसांना सांगितले. माहिती निश्चित होताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. (हेही वाचा Pune Online Fraud Case: डेटिंग अॅपवर झालेली ओळख पुण्यातील महिलेला पडली महागात, अज्ञात व्यक्तीकडून 73.5 लाखांची फसवणूक)

पोलिसांनी स्पा सेंटवरव केलेल्या कारवाईत दोन महिलाची सुटका केली. तर व्यवस्थापकाला अटक केली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस दप्तरी गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, या ठिकाणी महिलांचा वापर वेश्याव्यवसायासाठी केला जात असल्याचे पुढे आले.

दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी मुंबईतही एका सेक्स टुरिझम (Sex Tourism) रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या वेळी मुंबई क्राईम ब्रँचने मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) येथून दोन महिला दरालांना अटक केली. तर दोन तरुणींची सुटका केली. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.