Sewree Station Rail Accident: शिवडी रेल्वे स्थानकात अंध महिलेचा दोन बोगींच्या गॅप मध्ये पडून मृत्यू

अनेकदा घाईत किंवा चूकीच्या पद्धतीने चढलं-उतरल्याने फटीत अडकून अपघात झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

Dead-pixabay

मुंबई मध्ये शिवडी रेल्वे स्थानकामध्ये (Sewree Station) एका अंध महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही अंध महिला दोन बोगी मधील गॅप मधून खाली पडली आणि तिच्यावरून रेल्वे गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार 18 ऑक्टोबर दुपारी 4.30 च्या सुमारास घडली आहे. ही अंध महिला तिच्या अंध पती सोबत प्रवास करत होती. हार्बर लाईनच्या शिवडी स्थानकात ते उतरल्यावर हा अपघात झाला आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्य रेल्वेच्या हार्बर लाईन कॉरिडॉरवरील शिवडी स्टेशनवर मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरीय ट्रेनमधून ते खाली उतरले. त्यानंतर घाई घाईत ते बोगी बदलण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात महिला दोन बोगींच्या फटीमधून खाली पडली. महिलेला मदत करण्यासाठी कुणी पुढे येणार तोच ट्रेन सुरू झाली आणि ती तिच्या अंगावरून गेली. नंतर महिलेला रूग्णालयात नेण्यात आले पण हॉस्पिटल मध्ये नेताच तिला मृत घोषित करण्यात आले.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी काळजीपूर्वक प्रवास करण्याचा, रूळ न ओलांडण्याचा सल्ला वारंवार रेल्वेकडून प्रवाशांना दिला जातो. दिव्यांगांसाठी रेल्वे मध्ये विशेष राखीव डब्बा आहे. त्यामधून केवळ त्याच व्यक्तींना प्रवासाची मुभा आहे. अन्य लोकांनी त्या डब्ब्याचा वापर केल्यास तो दंडास पात्र ठरतो. नक्की वाचा: कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या 4 वर्षीय चिमुकलीचा लोकलच्या गर्दीत पडून दुर्दैवी मृत्यू .

अनेकदा घाईत किंवा चूकीच्या पद्धतीने चढलं-उतरल्याने फटीत अडकून अपघात झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.