Comrade Sundar Navalkar Passes Away: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
या चळवळींमधील बदल, उत्कर्ष आदींमध्ये त्यांचा स्थान नेहमीच वरचे राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील कम्युनिस्ट चळवळींचा एक धगधगता अंगार शांत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर (Comrade Sundar Navalkar) यांचे निधन झाल्या आहे. त्या 100 वर्षांच्या होत्या. आयुष्यभर अविवाहीत राहिलेल्या सुंदर नवलकर (Comrade Sundar Navalkar Passes Away) या निष्णात वकील होत्या. आपली उभी हयात त्यांनी फक्त आणि फक्त कामगारांच्या लढ्यासाठी अर्पण केली. अत्यंत कर्मठ, लढाऊ नेत्या अशी त्यांची ओळख होती. त्यांनी न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर अनेक लढाया त्यांनी मोठ्या जिद्दीने लढल्या.
महाराष्ट्रातील डाव्या चळवळींमध्ये सुंदर नवलकर यांचे मोठे योगदान होते. या चळवळींमधील बदल, उत्कर्ष आदींमध्ये त्यांचा स्थान नेहमीच वरचे राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील कम्युनिस्ट चळवळींचा एक धगधगता अंगार शांत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
काँम्रेड सुंदर नवलकर यांनी कॉम्रेड सुनील दिघे आणि लक्ष्मण पगार यांच्या सहकार्यालाने सी.पी.आय. (एम.एल.)ची महाराष्ट्र समिती सुरु कलेली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये देशभरात लागू करण्यात आलेल्या आणिबाणीविरोधातही त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या कार्याचे प्रतिबिंब हे दलित पँथर चळवळीमध्येही उमटल्याचे पाहायला मिळाले.