BJP Leader Padmanabha Acharya Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ आचार्य यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पद्मनाभ आचार्य हे लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी जोडले गेले. 1948 मध्ये RSS वरील बंदीच्या काळात त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवासानंतरही शिक्षण सुरू ठेवत आचार्य यांनी उडुपीच्या MGM कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Padmanabha Acharya (PC - Twitter)

BJP Leader Padmanabha Acharya Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ बालकृष्ण आचार्य Padmanabha Balakrishna Acharya (P B Acharya) यांचे शुक्रवारी त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी निधन झाले. पद्मनाभ हे 92 वर्षांचे होते. आचार्य यांनी 2014 ते 2019 दरम्यान आसाम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम केले. 1931 मध्ये कर्नाटक किनारपट्टीवरील उडुपी येथे जन्मलेल्या आचार्य यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

पद्मनाभ आचार्य हे लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी जोडले गेले. 1948 मध्ये RSS वरील बंदीच्या काळात त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवासानंतरही शिक्षण सुरू ठेवत आचार्य यांनी उडुपीच्या MGM कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कायद्याचे पुढील शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या संस्थापकांपैकी आचार्य यांनी ABVP मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ईशान्य भारताशी संबंधित समस्यांचे निराकरण केले. (हेही वाचा - Ashutosh Tandon Passes Away: उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि भाजप आमदार आशुतोष टंडन यांचे निधन, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक)

याशिवाय, 1995 ते 2001 दरम्यान आचार्य यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम केले. मुंबईत अनेक शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या उपनगर शिक्षण मंडळाचे त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आचार्य यांच्या निधनावरील शोक संदेशात म्हटलं आहे की, 'पद्मनाभ आचार्य हे एक उद्दिष्टपूर्ण जीवन जगले. एक सच्चा योद्धा, त्यांनी आपले जीवन देशाच्या एकात्मतेसाठी समर्पित केले. ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक वर्षे घालवताना त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले. मुंबईतील उपनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक जनक म्हणून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement