Mahavitaran App वर मीटरचं रिडिंग पाठवा, वीज बिलामधील गोंधळ टाळा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलांचे गोंधळ टाळण्यासाठी दिला नवा पर्याय

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्या मध्ये ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील राहून काम करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत.

Nitin Raut (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान महावितरणाने (Mahavitaran) सरसकट बील दिल्याने अनेकांनी ते वाढीव वीजबील असल्याचं सांगत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर वाढीव वीजबीलावरून राज्यभर आंदोलनं करण्यात आली. आता पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू असलेल्या महाराष्ट्रात ग्राहकांना वाढीव वीजबिलापासून सुटका हवी असल्यास त्यांनी मोबाईल अ‍ॅप द्वारा रीडिंग पाठवा आणि वीज बीलामधील गोंधळ टाळा असं आवाहन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात महावितरण कडून कर्मचारी मीटरचं रिडिंग घेऊ शकत नाहीत त्यामुळे सरासरी वीज बीलं देण्यात आलं मात्र आता या समस्येमधून सुटका मिळवण्यासाठी सरकारने एक नवं पाऊल उचललं आहे.

काल (6 एप्रिल) मंत्रालयामध्ये वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्या मध्ये ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील राहून काम करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत. यावेळीच या मोबाईल अ‍ॅप द्वारा रिडिंग पाठवण्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. नागपूर मध्ये महावितरणा कडून थकीत वीज बील न भरणार्‍यांची 'बत्ती गुल' करण्याला सुरूवात.

दरम्यान ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक चणचणीचा देखील सामना करावा लागत आहे त्यामुळे यापूर्वी महावितरणाकडून ईएमआय मध्ये हप्ते भरण्याचे आवाहन करण्यात आले होते तर आता वीज बिलांमधील गोंधळ कमी करण्यासाठी ऑनलाईन मोबाईल अ‍ॅप द्वारा रिडिंग देण्याचा पर्याय खुला करण्यावर चर्चा झाली आहे. यासोबतच उर्जामंत्र्यांनी वीज दर स्वस्त करण्याचेही पर्याय चाचपले असल्याचं सांगण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये मिनी लॉकडाऊन नंतरच्या समस्यांवर चर्चा केली त्यावेळेस वीज बिलांची देखील प्रश्न उपस्थित केला होता.