Seepage of Water at Coastal Road Tunnel Viral Video: कोस्टल रोड च्या बोगद्यात पाणी गळतीचा व्हिडिओ वायरल; CM Eknath Shinde अधिकार्यांसह पोहचले पाहणीला (Watch Video)
कोस्टल रोड वरील बोगद्यात होत असलेल्या पाणी गळतीला Injection Grouting द्वारा रोखलं जाईल आणि हा रस्ता सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईचा कोस्टल रोड (Coastal Road) मार्च 2024 पासून नागरिकांसाठी खुला तर करण्यात आला आहे मात्र या रोड वर काही महिन्यातच पाणी गळती होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडीयात चर्चा होत असलेल्या या व्हिडिओनंतर अनेकांनी निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र मुंबई महानगर पालिकेकडून मात्र हा रस्ता उत्तम असल्याचं सांगण्यात आलं आहे. 'आधीच्या Expansion Joints मधून हे पाणी गळत आहे त्यामध्ये Injection Grouting झाल्यानंतर हे सील होऊन जाईल' असे पालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील घेतला आहे. 'हे expansion joints दर 25-30 मीटर वर आहेत. आकुंचन आणि विस्तारासाठी हे आवश्यक असून त्यामुळे क्रॉंक्रीटचा भाग व्यवस्थित राहतो. दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता सुरक्षित आहे आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याचं ' असे बीएमसी ने सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी इंजेक्शन देण्याचं काम दोन्ही बाजूच्या 25-30 पिलर वर केले जाईल असं म्हटलं आहे.
कोस्टल रोड च्या उत्तरेकडील बोगद्याचे कामही सुरू आहे. बीएमसी अधिकाऱ्यांनी देखील पुष्टी केली आहे की वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही आणि वाहतुकीवर परिणाम होणार नाही. या वर्षी मार्चमध्ये मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हा हा संपूर्ण रस्ता मे महिन्यापर्यंत खुला करण्याचा प्रस्ताव होता. मात्र पालिकेतील सूत्रांनी सांगितले की, दोन्ही रस्ते सुरू करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोड वरील पाणी गळतीचा व्हिडिओ वायरल
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोस्टल रोडवर पाणीगळती आणि पूर्ण क्षमतेने तो सुरू करण्याला उशिर होत असल्याने आता युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे देखील त्यावरून सरकार वर कडाडले आहेत. X वर पोस्ट करत त्यांनी ' भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केलं.आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आली. जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच!' असं म्हणत बीएमसीला नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का? असा सवालही विचारला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)