Schools Reopen in Nashik: नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू; ड्यूटी जॉईन करण्यापूर्वी 62 शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

मीण भागातील आणि नाशिक शहर हद्दीतील 1,324 शाळांपैकी 846 शाळांनी 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

Schools Reopen in Nashik: नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 9 ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शाळा सोमवारी पुन्हा उघडल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी 62 शिक्षकांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. ग्रामीण भागातील आणि नाशिक शहर हद्दीतील 1,324 शाळांपैकी 846 शाळांनी 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोविड साथीच्या उद्रेक आणि त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मार्चअखेरपासून बंद झालेल्या शाळांमध्ये तब्बल 1,21,579 विद्यार्थी होते. शाळा पुन्हा सुरू करण्यापूर्वी 7,063 मुख्याध्यापक / शिक्षक आणि 2,500 शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 62 मुख्याध्यापक / शिक्षक आणि 10 शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. (हेही वाचा - Maharashtra: ब्रिटेन येथून आलेल्या 8 जणांना COVID19 च्या नव्या रुपातील स्ट्रेनची लागण, संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याची राजेश टोपे यांची माहिती)

दरम्यान, नवीन निकषानुसार एका दिवशी केवळ 50 टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहतील आणि बाकीचे विद्यार्थी दुसर्‍या दिवशी शाळेत हजर राहतील, असेही निवदेनात म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी शाळा स्वच्छ करणे, स्कॅनिंग, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझ वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे हे नियम अनिवार्य करण्यात आले आहेत.