Schools Reopen In Maharashtra: इयत्ता 5 वी ते 8 पर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु- वर्षा गायकवाड
त्यानुसार इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा पूर्ववत सुरु झाल्या आहेत. हे वर्ग सुरु झाल्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपली आहे.
राज्यातील शाळांमधील (Schools in Maharashtra) इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरु होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित एक बैठक पार पडल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार आहे.
इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास राज्याच्या शिक्षण विभागाने या आधीच परवानगी दिली आहे. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा पूर्ववत सुरु झाल्या आहेत. हे वर्ग सुरु झाल्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपली आहे.
शाळा सुरु होणार असल्या तरी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने घालून दिलेले सर्व नियम पाळण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या आधीही शाळा सुरु झाल्या तेव्हा आरोग्य विभागाने घालून दिलेले सर्व नियम कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आजही हे सर्व नियम शाळांतून पाळले जात आहेत. (हेही वाचा, Maharashtra Board Exams 2021 Dates: 10 वी,12वीच्या यंदाच्या परीक्षेच्या तारखा आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता)
वर्ग सुरु करण्यापूर्वी संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी लागणार. तसेच, शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांकडून संमतीपत्र अशा स्वरुपाचे नियम शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभागाने केले आहेत.