School Starts From Today: 'स्कूल चलें हम' महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

अनेक विद्यार्थी (Students) पहिल्यांदाच नव्या शाळेत जाणार आहेत. बहुतांश विद्यार्थी पुढच्या इयत्तेत जाणार आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि लगबगीचे वातावरण आहे. राज्यातील शाळांमधला किलबीलाट आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपून राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा नव्याने सुरु (School Starts From Today) होत आहे.

Students | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

First Day of School: राज्यातील शाळांमधला किलबीलाट आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपून राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा नव्याने सुरु (School Starts From Today) होत आहे. त्यामुळे घराघरांमध्ये आणि शाळांमध्ये उत्साहेच वातावरण आहे. अनेक विद्यार्थी (Students) पहिल्यांदाच नव्या शाळेत जाणार आहेत. बहुतांश विद्यार्थी पुढच्या इयत्तेत जाणार आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि लगबगीचे वातावरण आहे. पाठिमागचे वर्ष हे कोरोनानंतररच पहिलेच वर्ष होते. त्यामुळे अनेक शाळांना, विद्यार्थी आणि पालकांनाही शाळांनाही विविध समस्या आणि आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक शाळांवर तसे दडपण होते. मात्र, आता करोनाचे संकट पूर्णपणे निवळले असल्याने जवळपास सर्वच शाळा, विद्यार्थी आणि पालक नव्या दमाने सक्रीय झाले आहेत.

केवळ शैक्षणिक वर्तुळातच नव्हे तर बाजारपेठांमध्येही शाळा सुरु झाल्याचे वातावरण आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. विद्यार्थी नवा गणेवेष, दप्तर आणि मोठ्या उत्साहात शाळेच्या आवारात वावरत आहेत. शिक्षकांमध्येही विद्यार्थ्यांची भेट जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंर झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. शाळा सुरु होणार असल्याने शाळा प्रशासनाने आगोरच स्वच्छता आणि शालेय इमारतींची कामे पूर्ण केल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, One State One Uniform: 'एक राज्य एक गणवेश' योजनेची यंदापासून होणार अंमलबजावणी; मंत्री दीपक केसरकर यांची माहिती)

शाळा सुरु होणे ही केवळ प्रक्रिया असत नाही. त्यासोबत इतर अनेक गोष्टी येतात. जसे की, बाजारातील उलाढाल, रोजगार आणि सामाजिक उपक्रमसुद्धा. शाळा सुरु झाल्याने दुकानांमधून वह्यापुस्तके, गणवेष आदींची विक्री होते. शिलाईच्या दुकांनांमध्ये गणवेश शिवले जातात, विद्यार्थ्यांना शाळेला सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी रिक्षा, बस यांनाही काम मिळते. त्यामुळे शाळा सुरु होण्याची समाजातील अनेक घटकांकडून वाट पाहिली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif