School Bus Fare Hike: स्कूल बससाठी 30 टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता

तसेच सरकारने निर्बंधामध्ये सुद्धा शिथीलता आणली आहे. अशातच नुकत्याच शाळा आणि महाविद्यालये ही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

School Buse | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com

School Bus Fare Hike: राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा कमी झाल्याने काही गोष्टी पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारने निर्बंधामध्ये सुद्धा शिथीलता आणली आहे. अशातच नुकत्याच शाळा आणि महाविद्यालये ही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तुमचे मुले शाळेत जात असतील तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण स्कूल बससाठी 30 टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय बस मालक संघटनेकडून घेण्यात आला आहे.(BMC Budget 2022: मुंबई महापालिका अर्थसंकल्प 45 हजार 949 कोटींचा; आरोग्य, डिजिटल शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर)

सध्याची वाढती महागाई, इंधनांचे वाढलेले दर आणि 50 टक्के क्षमेतेसह मुलांची ये-जा करणे थोडे कठीण जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जरी राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षांचा रोड टॅक्स माफ केला असला तरीही या काही गोष्टींचा फटका बस मालकांना बसत आहे. त्यामुळेच भाडेवाढ करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(RTI Admission Timetable 2022-23: आरटीईच्या शैक्षणिक वर्षासाठी 25% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर)

दरम्यान, कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने स्कूल बस मालकांना त्याचा मोठा फटका बसला. तसेच कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणे, बसची देखभाल या सर्व गोष्टी पाहता भाड्यात वाढ करण्याचा विचार करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. परंतु बसमध्ये 50 टक्के क्षमता म्हणजेच 20 मुल प्रवास करतात. अशातच जर पूर्ण क्षमतेसह जरी बस स्कूल केल्यास त्याच्या भाडेवाढ करावी लागेल असे बस मालकांच्या संघटनेचे म्हणणे आहे.