Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University: वेळापत्रक जाहीर, पण परीक्षा कुठल्या अॅपवरून होणार? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी प्रचंड संभ्रमात
त्यानंतर मार्च महिन्यात संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, देशातील सर्व व्यापार, उद्योगधंदे आणि व्यवसायांसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. याचबरोबर शिक्षण क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) गेल्या वर्षी भारतात दाखल झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, देशातील सर्व व्यापार, उद्योगधंदे आणि व्यवसायांसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. याचबरोबर शिक्षण क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) हिवाळी परीक्षा आता 4 महिने उशीराने होत आहेत. या परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे. मात्र, परीक्षा कुठल्या ‘अॅप’वर होणार? याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती न मिळल्याने विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना 25 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यात बी.एस्सी., बी.कॉम, बीसीए, बी.फॉर्म, बीबीए, बीए, एलएलबी व इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, इतकीच विद्यार्थ्यांना माहिती आहे. परंतु, परिक्षा कशा आणि कुठल्या अॅपवर होणार? तसेच या परिक्षेचे स्वरूप कसे असणार? याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. हे देखील वाचा- वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 4 एप्रिल पर्यंत शहरात 5 पेक्षा अधिक लोकांच्या जमावावर बंदी
विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या हिवाळी परीक्षा प्रोमार्क कंपनीकडून घेतल्या होत्या. परंतु, या परीक्षा पद्धतीमधील चुका आणि तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ उडाला होता. यामुळे विद्यापीठाने यावेळी नवी कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विद्यापीठाने अद्यापही नवीन कंपनीची नियुक्ती केली नाही. परिक्षेला केवळ आठ दिवस उरले असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या होणाऱ्या या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. चिंताजनक म्हणजे, महाराष्ट्रात अटोक्यात आलेला कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ज्यामुळे या परिक्षा आणखी काही महीने पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.