सातारा: शरद पवार यांच्या भाषणात उदयनराजे भोसले यांचा अनुल्लेख

त्यामुळे या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांच्याविषयी शरद पवार काय बोलणा याबाबत उत्सुकता होती

Sharad Pawar | (Photo credit : Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याबद्दल काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमांनाही जोरदार उत्सुकता होती. परंतू, आपल्या संबंध भाषणात शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांचा अनुल्लेख केला. त्यामुळे राजेंच्या राष्ट्रवादी सोडण्यावर पवारांना काय वाटते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच राहिली. कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) जयंती सोहळा सातारा येथे पार पडला. या वेळी कर्मवीर समाधी परिसरात आयोजित कार्यक्रमात शरद पवार आज (रविवार, 22 सप्टेंबर) बोलत होते.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा शहरात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांच्याविषयी शरद पवार काय बोलणा याबाबत उत्सुकता होती. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा जिल्ह्यात खिंडार पडले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाला खूप दिले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आज रयत शिक्षणसंस्था काम करते आहे. रयत शिक्षण संस्था परिसरात पाऊल ठेवले की, राजकीय विषय बाजूला ठेवले जातात. कर्मविर अण्णांनी दाखवलेल्या मार्गावरुन आज ही संस्था मार्गक्रमण करत आहे. परंतू, अण्णांचे विचार पुढे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आज आपण ज्या टप्प्यावर आलो आहोत त्याच्याही खूप पुढे आपल्याला जायचे आहे, अशी भावना पवार यांनी या वेळी व्यक्त केली. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांना पहिला धक्का; सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लांबणीवर)

दरम्यान, उदयनराजे भोसले यांना निवडणूक आयोगामुळे पहिला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या तिकिटावर विद्यमान खासदार म्हणून निवडूण आल्याला अवघे शंभर दिवस पूर्ण होत असतानाच उदयनराजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला आहे. उदयनराजे यांचा पक्षप्रवेश दणक्यात पार पडल्यावर विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा येथूनही पोटनिवडणूक (Satara Bypoll Election) घेतली जाईल, असा अनेकांचा कयास होता पण, तसे घडले नाही. देशभरात लोकसभेच्या 64 जागांवर पोटनिवडणुका देशभरात पार पडत आहेत. मात्र, या 64 जागांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश नाही.



संबंधित बातम्या

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार; CM Devendra Fadnavis यांची माहिती