Satara: बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणाऱ्या मजनूला बेदम चोप, मुलं चोरणारा व्यक्ती समजून केली धुलाई

परंतु ही आयडिया प्रियकराला भलतीच महागात पडली. मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

Hijab | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

प्यार किया तो डरना क्या असं म्हणत प्रेमात असणारे कुठल्याही सिमा पार करतात. पण साताऱ्याच्या (Satara) एका मजनूला त्याची मजनूगिरी चांगलीचं महागात पडली आहे. साताऱ्यातील तामजाईनगरमध्ये (Tamjai Nagar) एक विचित्र घटना घडली आहे. एक तरुण आपल्या प्रियेसीला भेटण्यासाठी वेशांतर करुन प्रियसेच्या घराच्या परिसरात पोहचला. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून या तरुणाने बुरखा परिधान केला. पण प्रियेसीच्या घराचा नेमका पत्ता माहिती नसल्याने वेशांतर केलेल्या तरुणाने एका दुकानदारास पत्ता विचारला. दुकानदारास हा प्रकार जरा विचित्र वाटला आणि बुरखा उघडून बघता तर काय बुरख्या आड स्त्री नाही तर चक्क पुरुष आणि तोच परिसरातील लोकांनी वेशांतर करुन आलेल्या तरुणास बेदम चोप दिला आहे.

 

राज्यातील (Maharashtra) विविध शहरांमध्ये लहान मुलं पळवणाऱ्यांची टोळी सक्रीय झाल्याची मोठी अफवा पसरली आहे. पोलिसांनी (Police) अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असलं तरी नागरिक सध्या सतर्क मोड मध्ये आहे. त्यात हा बाप्या थेट बुरखा घालून स्त्रीच्या वेश साकारल्याने शंका आणखीचं पक्की झाली. वेशांतर केलेल्या या तरुणास पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतल आहे. (हे ही वाचा:- Guhagar Love Story: प्रियकराचा श्रृंगार उघडा पडला, बुरख्यातली बाई बाप्या निघाला; गुहागरच्या शृंगारतळी बाजारात भलताच प्रकार घडला)

 

या तरुणाची चौकशी केली असता आधी या तरुणाने काहीचं स्पष्ट सांगितलं नाही पण पोलिसांनी (Police) खाक्या दाखवल्या नंतर या तरुणाने घडलेला सगळा प्रकार खरा सांगितला. तसेच प्रियेसीला (Girlfriend) भेटायला गेलेला हा तरुण विवाहीत असुन त्याची प्रियेसी देखील विवाहीत (Married) असल्याची चक्रावून टाकणारी माहिती या तरुणाने दिली. कुणालाही कानोकान खबर लागू नये म्हणून प्रियेसीला भेटण्यासाठी तरुणाने ही शक्कल लढवल्याची कबूली या तरुणाने दिली आहे.